अखेर ‘ तो ‘ अपहृत मुलगा मध्यप्रदेशात सापडला : काय आहे प्रकरण ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीला आली होती. सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील हॉटेल मालकाच्या अकरा वर्षाच्या मुलाचे त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका आचाऱ्याने पैशाचा आणि भांडणाचा राग मनात धरून अपहरण केले होते . मोहोळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून या आरोपीला मध्य प्रदेशात जाऊन इथून मुलासह ताब्यात घेतले असून मुलाला सुखरूप त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आलेले आहे.

काय आहे प्रकरण ?

उपलब्ध माहितीनुसार, नागेंद्र शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी मोहोळ येथे एक हॉटेल भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. अंकोली इथे त्यांचे हे हॉटेल असून तिथे शर्मा पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचा मावस भाऊ सोनू ओझा हा मूळचा मध्य प्रदेश येथील असून तो शर्मा यांच्या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. हॉटेल चांगले चालत आहे हे त्याला माहीत होते त्यामुळे त्याने याआधी देखील गल्यातील पैसे चोरले होते.

दहा मार्च रोजी हॉटेलचे मालक शर्मा यांच्या पत्नीकडून गावी पैसे पाठवायचे आहेत असे सांगून त्याने वीस हजार रुपये घेतले आणि तो सोलापूरला गेला. 11 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता तो पुन्हा आला आणि त्या वेळी त्याच्या सोबत शर्मा यांचा मुलगा अमन हा होता त्यानंतर मात्र अमन आणि दोघेही दिसून आले नाहीत आणि शर्मा यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी परिसरातच कुठेतरी असतील असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी विचारपूस केली मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत . ओझा याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद आढळून आला आणि त्यानंतर मनोज ओझा यानेच मुलाला पळवले आहे याची अमनची आई सुषमा देवी यांची खात्री झाली त्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात धाव घेण्यात आली आणि संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला मध्य प्रदेशातून बेड्या ठोकण्यात आल्या.


शेअर करा