
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यात उघडकीला आली असून एका तरुणाचे अपहरण करून तब्बल वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर किसन चव्हाण ( वय 23 ) , लखन किसन चव्हाण ( वय 26 ) आणि लक्ष्मण नथुजी डोंगरे ( वय 22 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत सोबतच दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे २ जुलै २०२२ रोजी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथील त्यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाने पाणीपुरीची गाडी लावली होती. दोन जुलै रोजी नऊ वाजता तो घरी येत असताना या आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याच्या वडिलांकडून वीस लाखांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू अशी देखील धमकी त्यांनी दिली होती. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी कारवाई करत तीनही जणांना अटक केली होती.