अखेर विवाहिता ‘ त्या ‘ प्रकरणाला राजी झाली मात्र सोमनाथच फरार झाला

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर येथे उघडकीला आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सोमनाथ राम गुंडाराम ( वय 23 राहणार सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून सदर महिला ही 2019 मध्ये एका सणानिमित्त माहेरी आलेली होती त्यावेळी तिची सोमनाथ गुंडाराम याच्यासोबत ओळख झाली त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले आणि सतत संपर्कात राहू लागले.

काही दिवस असेच गेल्यावर सोमनाथ याने एके दिवशी तिला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुझ्या नवऱ्याला तू सोडून दे असे सांगितले मात्र विवाहितेने त्याला नकार दिला तरीदेखील त्यांनी वारंवार तिला लग्नाचे आमिष दाखवले अखेर विवाहिता त्याला राजी झाली आणि सोमनाथ गुंडाराम याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पती आणि मुलांना सोडून ती माहेरी आली.

माहेरी आल्यानंतर ती सोमनाथ याच्या सोबत सतत संपर्कात राहू लागली आणि दरम्यानच्या काळात कोरोना सुरू झाला त्यावेळी त्याने लॉक डाऊन सुरू असताना एका मंदिराजवळील बागेत तिला बोलावले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर काही वेळात पुन्हा एकदा एका हॉटेलवर घेऊन गेला आणि तिथे देखील तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला असे पीडितेचे म्हणणे आहे.


शेअर करा