.. अग म्हणून मालिश करावी लागते, कब्बडी खेळणाऱ्या मुलीला ‘ वेगळाच ‘ अनुभव

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर येथे समोर आलेली असून एका कबड्डीच्या शिक्षकाकडून एका अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग करण्यात आलेला आहे. जुनी कामठी परिसरात ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकारानंतर खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जयप्रकाश मेथीया ( वय 39 राहणार कामठी ) असे आरोपीचे नाव असून तो एका अल्पवयीन मुलीचा कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करतो. याच दरम्यान तो अनेकदा या मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत असायचा. उंची वाढवण्यासाठी मालिश करावी लागते असे म्हणत तो जबरदस्तीने तिला वेगवेगळ्या परिसरात फिरायला घेऊन जात असायचा.

अशाच एका प्रसंगात त्याने दुचाकी तिला चालवायला लावली आणि मागे पाठीमागे बसून तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्याचे असे वागणे खटकले आणि अल्पवयीन मुलीने या प्रकरणी सर्वप्रथम घरी सांगितले आणि त्यानंतर त्याच्या विरोधात जुनी कामठी येथे पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे.


शेअर करा