‘ अडवतोस कुणाला ? मी भाजप आमदाराची मुलगी ‘ , मात्र पुढे जे घडले..

शेअर करा

भाजप आमदारांचे सत्तेत आल्यानंतरचे वर्तन हे अनेकदा चर्चेत आलेले आहे. सत्तेत आल्यानंतर सत्तेची नशा आणि त्यातून अनेकदा कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत मात्र त्यांचे कुटुंबीय देखील काही कमी नाहीत.अशीच एक घटना बंगळुरू येथे उघडकीला आलेली असून सिग्नल तोडल्यानंतर अडवलेल्या वाहतूक पोलिसांसोबत कर्नाटक भाजप आमदाराच्या मुलीने वाद घालून दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बंगळुरूतील राजभवन येथे ही घटना घडलेली असून भाजप आमदार अरविंद लिंबावली यांची मुलगी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कार मधून जात होती मात्र तिने सिग्नल तोडला म्हणून वाहतूक पोलिसांनी तिला पुढे अडवले त्यावेळी तिने आपण आमदाराची मुलगी आहे असे सांगून दमदाटी करण्यास सुरुवात केली होती.

सदर घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार्‍या पत्रकारास देखील तिने दमदाटी केली मात्र पोलिसांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गाडी चालवताना तिने सीट बेल्ट लावलेला नव्हता आणि यापूर्वी देखील तिने अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले असून त्यानुसार तिला दहा हजार रुपयांचा दंड होता व तो जागीच वसूल करून घेण्यात आला.


शेअर करा