
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा नागरिकांवर असलेला वापर वाढलेला पाहायला मिळत आहे मात्र याच दरम्यान काही विकृत व्यक्ती नको ते प्रकार करण्याचे देखील प्रमाण वाढलेले आहे. फेसबुक या सोशल मीडियावर ओळखीच्या महिलेचे छायाचित्र आणि तिचा मोबाईल नंबर अपडेट अपलोड करून ती कॉल गर्ल असल्याची बदनामी करणाऱ्या आरोपीला औरंगाबाद सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आसाराम बापू आश्रमातून पकडून आणलेले आहे.
आरोपी हा मूळचा ओडिसा राज्यातील रहिवासी असून तो गेल्या वर्षी औरंगाबाद येथे राहत होता. गोविंद राजेंद्र नाईक ( वय 36 ) असे या आरोपीचे नाव असून त्याने शहरातील एका महिलेचे छायाचित्र वापरुन फेसबुक वर तिच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवले होते. त्यामध्ये सदर महिलाही कॉलगर्ल असल्याचे सांगत त्यांनी तिचा मोबाईल नंबर देखील तिथे टाकला होता. हा नंबर पाहिल्यानंतर अनेक विचित्र लोक या महिलेला फोन करू लागले तसेच काहींनी या नंबरवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो देखील पाठवले होते. सातत्याने हा प्रकार आपल्यासोबत होत असल्याने पीडित महिलेने 21 ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
तपास सुरू झाल्यानंतर गोविंद याने पैठण शहरातील एका ज्येष्ठ नागरिक महिलेशी गोड बोलत यांचे सिम कार्ड घेतले आणि त्या सिम कार्डचा वापर करत त्याने अँड्रॉइड मोबाईल वरून पीडित महिलेचे बनावट प्रोफाइल तयार केले. सिम कार्ड घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो औरंगाबाद शहरातून निघून गेला आणि त्याने हा उपद्व्याप केला. पीडित महिलेची त्याच्यासोबत फक्त दोन दिवसांची ओळख होती त्यामुळे त्याचे नाव आणि तो कोणत्या शहरातील रहिवासी आहे याची देखील महिलेला माहिती नव्हती मात्र सदर गुन्ह्यासाठी त्याने वापरलेला अँड्रॉइड फोन आणि मोबाईलनंबर इतक्याशा जुजबी माहितीवर पोलिसांनी त्याला आसाराम बापू आश्रमातून पकडून बेड्या ठोकल्या.