..अन अखेर ‘ त्या ‘ कबड्डी शिक्षकाला जन्मठेप , महाराष्ट्रातील प्रकरण

शेअर करा

महाराष्ट्रातील एक धक्कादायक घटना समोर आलेली असून अकोला जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादण्यात आले आणि आणखी एका मुलीचा देखील विनयभंग करण्यात आला याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पीडी पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी कब्बडी प्रशिक्षक असलेला आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे याला जन्मठेप आणि तीन लाख दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी शुद्धोदन हा कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. कबड्डी प्रशिक्षणाला येणार्‍या एका अल्पवयीन मुलीला त्याने कबड्डी संघातून काढून टाकण्याची धमकी देत तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. या संबंधातून पुढे ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीला आली. मुलीच्या आईने 20 जुलै 2018 रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर प्रकरणी सरकारी पक्षाने नऊ साक्षीदार तपासले आणि आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने शुद्धोधन अंभोरे याला भादवि कलम 376 2 आणि पॉक्सो कायदा कलम लावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


शेअर करा