अन ‘ त्या ‘ प्रकरणात केदार दिघे यांचे नाव आले कसे ? जाणून घ्या पूर्ण प्रकरण

शेअर करा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी रुजू होताच ठाणे जिल्ह्यात त्यांना आव्हान म्हणून केदार दिघे यांची नेमणूक शिवसेनेकडून जिल्हाप्रमुखपदी करण्यात आली होती मात्र त्यांची नेमणूक होताच त्यांच्याविरोधात अत्याचार पीडित तरुणीला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांसमोर चौकशीला येण्याची त्यांना सांगण्यात आलेले आहे मात्र त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन देखील तात्काळ मंजूर केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 25 जुलै रोजी लोअर परेल येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका नोकरदार तरुणीवर केदार दिघे यांचा मित्र असलेला रोहित कपूर याने अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एका क्लबची मेंबरशिप देण्याच्या बहाण्याने रोहित कपूर याने पीडित महिलेला हॉटेलमधील आपल्या रूममध्ये बोलावून घेतले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला असे पीडितेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी कुठे न बोलण्यासाठी त्याने तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नकार दिला. सदर प्रकरणात केदार दिघे यांनी मध्यस्थी केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.

केदार दिघे यांच्यावरील आरोपांमध्ये पीडित महिला ही ऐकत नसल्याने त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असेही म्हटलेले असून पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर दिघे यांच्यासोबतच रोहित कपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केदार दिघे यांनी या आरोपाचे खंडन केले असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात हे प्रकरण बाहेर काढून विनाकारण आपले नाव त्यात गोवून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असे म्हटले आहे .


शेअर करा