
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बीड येथे समोर आलेली असून सदर घटनेने ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण किती वाढलेली आहे हे समोर आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सरकार दरबारी असलेले निर्बंध यामुळे पारंपारिक पद्धतीने हरिनाम सप्ताह घ्यायचा की नाही या संदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. बोरगाव चकला येथील ही घटना असून बैठकीतच अरे कारे सुरू झाल्याने एका महिला सरपंचाच्या डोक्याला पिस्तूल लावली म्हणून सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, छबुबाई ञानोबा राख ( वय 67 ) या बोरगाव चकला गावच्या सरपंच आहेत. हरिनाम सप्ताहबद्दल त्यांनी गावकरी यांची बैठक बोलावली होती त्यावेळी दादासाहेब शहादेव राख याने सप्ताह आम्ही घेणार आहोत असे म्हणत तुम्ही कोण ? असा प्रश्न विचारात सरपंचाचा अवमान केला त्यावेळी छबुबाई यांनी शिवीगाळ का करतो ? असा प्रश्न विचारला असता त्याने त्यांच्या अंगावर चप्पल भिरकावली आणि त्यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
पुतण्या छबुबाई यांचा पुतण्या प्रवीण याच्या डोक्यात आरोपींनी काचेची बाटली फोडली त्यामुळे दादासाहेब राख , शहादेव भानुदास राख, नागेश रामदेव राख रामराव एकनाथ राख ,ज्ञानेश्वर किसन राख, उद्धव रघुनाथ खेडकर यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .