.. अन ‘ म्हणून ‘ संतप्त बायकोने पळून पळून पतीला बांबूने धुतले, नागरिकांनी केले ऍडमिट

शेअर करा

संसार म्हटला की किरकोळ वाद आलेच मात्र संतप्त झालेली पत्नी कधी काय करेल याचा नेम नाही अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात समोर आलेली असून जेवण झाल्यानंतर भात भाजी असलेल्या ताटात हात धुतला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला बांबूच्या काठीने जोरदार बदडलेले आहे. भंडारा तालुक्यातील उसरा गोंदी येथे ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली असून पतीने पोलिसात धाव घेत पत्नीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

राजेंद्र दुधाराम वाढवे ( वय 36 ) असे पतीचे नाव आसून उमा राजेंद्र वाढवे असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी राजेंद्र यांनी पत्नीला जेवण वाढवण्यास वाढण्यास सांगितल्यानंतर पत्नीने ताटात वेगवेगळ्या भाज्या वाढल्या मात्र जेवण झाल्यानंतर राजेंद्र यांनी ताटात हात धुतला म्हणून उमा आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली.

संतप्त झालेल्या उमा यांनी हातात बांबूची काठी घेऊन व त्यांचा पाठलाग करत बदडायला सुरुवात केली त्यावेळी काठीचा एक जोरदार फटका राजेंद्र यांच्या डोक्यावर लागला आणि त्यातून रक्त निघू लागले. परिसरात नागरिक जमा झाले आणि त्यांनी हस्तक्षेप करत राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर राजेंद्र यांनी पत्नीविरुद्ध तक्रार देण्यासाठी कारधा पोलीस ठाणे गाठले आणि तिच्या विरोधात तक्रार दिली. सदर प्रकरणी पोलीस देखील अचंबित झाले मात्र अखेर त्यांनी तक्रार दाखल करून घेतली .


शेअर करा