.. अन ‘ शेकू ‘ मला आखाड्यावर घेऊन गेला , पीडिता म्हणतेय की ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून लग्नाचे आमिष दाखवून आखाड्यावर कामावर असलेल्या एका विवाहित महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मूळची किनवट तालुक्यातील बडवली येथील ही महिला औंढा तालुक्यातील नंदगाव येथील शेकूराव मुंजाजी ठेंगल याच्या आखाड्यावर कामाला होती. तिचे लग्न झालेले आहे हे देखील त्याला माहीत होते मात्र तरी देखील शेकूने तिला लग्नाचे आमिष दाखवले.

महिलेने विरोध केला असता तरी देखील त्याने तिला औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपरी येथील गावात एका शेताच्या आखाड्यावर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने म्हटले असून तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे .


शेअर करा