
भाजप सोबत शिवसेना सत्तेत असताना चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्यामागे खेकडे हे कारण होते असे म्हटल्यानंतर तत्कालीन शिवसेनेत असलेले नेते मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका झाली होती त्याबद्दल तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा मी आजही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे असे म्हटले आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांनी तुम्ही मागील सरकारने काय केले असे विचारत आपण त्यातील निम्मे मंत्री तुमच्याकडेच आहेत असे बोलत तानाजी सावंत यांच्याकडे बघून, ‘ खेकड्यामुळे धरण फुटले तुम्हाला खेकड्याबाबत काही सांगायचे आहे का ? मला त्या खेकड्याने बाबत ऐकायचे आहे, ‘ असे एकनाथ खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले की, ‘ मी एक इंजिनियरिंगचा विद्यार्थी असून तांत्रिकदृष्ट्या त्यावर भाष्य केले होते. उन्हाळा जसा वाढत जातो तसे खेकडे ओलावा असेल तिकडे खोल जातात. पावसात अथवा ढगफुटीमुळे प्रचंड दबावाने पाणी आल्याने ते पाणी वेगाने खाली जाते आणि दबावाने तो बांध फुटतो असे तांत्रिक कारण आहे. मेरीच्या अहवालात ते आहे . मी तेव्हा असे होऊ शकते असे म्हणालो होतो मात्र माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला मात्र मी अद्यापही त्यावर ठाम आहे, ‘ असे देखील ते म्हणाले.