आई कामाला गेली कि अक्षरश:. , न्यायालय म्हणाले

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे उघडकीला आली होती. शाळेतील एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदर प्रकरण हे सुरुवातीला पोलिसात आणि त्यानंतर न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाने सदर प्रकरणातील आरोपी रामदास रोहिदास मोरे याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश एम एस शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 13 डिसेंबर 2020 रोजी पीडित मुलीची आई ही शेतात गेलेली असताना आरोपी रामदास मोरे याने पीडित मुलीला घरी बोलावून घेतले आणि तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ मी काढलेले आहेत त्यामुळे मी सांगेल तसे वागायचे नाही तर ही व्हिडिओ शूटिंग सगळीकडे पाठवील, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती त्याच्या या धमकीमुळे पीडित मुलगी घाबरून गेली.

त्यानंतर मुलीची आई मजुरीच्या कामावर गेलेली असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी रामदास मोरे याने पीडित मुलीला घरी बोलावून घेतले आणि तिला धमकावून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायला सुरु केले. अनेक वेळा त्याने हा प्रकार केल्याने पीडित मुलगी ही गर्भवती राहिली आणि प्रकरण श्रीगोंदा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

सदर प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सखोल तपास करून आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे हस्तगत केले आणि त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस अंमलदार कयूम पठाण, संतोष साबळे पोलीस अंमलदार आशा खामकर यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले तर सरकारी वकील म्हणून कापसे यांनी कार्यालयीन कामकाज पाहिले.


शेअर करा