‘ आजारपणाला कंटाळून नव्हे ‘ तर तो खूनच अन आरोपी इतका जवळचा की .., पोलिसही हादरले

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील परळी इथे घडली होती. मयत व्यक्तीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने रचला होता मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही आणि खुनाच्या गुन्ह्यात चक्क मुलगाच आरोपी आढळून आल्याने पोलीस देखील हादरले . हत्येच्या सात दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला गजाआड केलं असून पुढील तपास पोलीस करत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अजय शांतीलाल लुंकड असं हत्या झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते प्लॉट व्यावसायिक होते तर सिद्धार्थ अजय लुंकड असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा सिद्धार्थ याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम नव्हतं, त्यामुळे त्यांची हत्या केली अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे .

1 नोव्हेंबर रोजी प्लॉट व्यावसायिक अजय लुंकड हे आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते. एकंदरीत परिस्थिती पाहून अजय यांनी आत्महत्या केली असावी असे वाटत होते मात्र मुलगा सिद्धार्थ याचं एकूणच वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलीस त्याच्यावर नजर ठेवून होते . अशातच पोस्ट मार्टेममध्ये यांची हत्या ही गळा आवळून केल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि पोलिसी हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

आरोपी मुलगा सिद्धार्थ याला पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअरींगचं शिक्षण घ्यायचं होतं. पण वडील अजय यांनी त्याला औरंगाबाद येथेच शिक्षणासाठी ठेवलं होतं. त्यामुळे वडील आपल्यावर प्रेम करत नसल्याची भावना त्याच्या मनात तयार झाली होती. यातूनच त्याने आपल्या वडिलांना संपवलं असल्याचे त्याचे हे कारण ऐकून पोलिसांना औरंगाबाद इथे घडलेल्या घटनेची आठवण झाली.


शेअर करा