‘ आपल्यासोबत लग्न कर ‘ म्हणत दहा लाख उकळले , पुण्यात एक जण ताब्यात

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून ‘ आपल्यासोबत लग्न कर ‘ म्हणून एका महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल दहा लाख रुपये उकळण्याचा प्रकार समोर आलेला आहे. पुणे शहरातील मंगळवार पेठ येथील ही पीडित तरुणी असून पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ सुपेकर ( राहणार भवानी पेठ ) असे आरोपी तरुणाचे नाव असून मंगळवार पेठेत पीडित तरुणी राहते. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपी सौरभ याने फिर्यादी तरुणीला आपल्यासोबत लग्न करण्याचा आग्रह केलेला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून 11 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी रजिस्टर लग्न देखील केले त्यानंतर त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी तिला देऊ लागला.

आरोपी असा काही प्रकार करेल याची फिर्यादी यांना कल्पनाच नव्हती त्यामुळे त्या घाबरून गेल्या आणि त्यांनी त्याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला आपल्या घरी राहण्याची देखील तो जबरदस्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर आरोपीने तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली आणि तिला देखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर मात्र पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दिलेली आहे. डिसेंबर 2020 पासून आरोपीने आपल्यासोबत अशा स्वरूपाचे धक्कादायक प्रकार केलेले आहेत असे पिडीतेचे म्हणणे आहे.


शेअर करा