‘ आमचं काय ? ‘ म्हणणाऱ्या ‘ त्या ‘ पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात एक लाचखोरीचे एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यांत मदत करण्याच्या मोबदल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच सदर पोलीस कर्मचारी फरार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, राहुरी शहरातील तक्रारदार यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. त्या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शहामद शेख हे करत होते त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तपास कामी मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी लाच मागणीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला त्यामध्ये पोलीस कर्मचारी शेख यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेख यांच्याविरोधात 1988 चे कलम सात प्रमाणे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सरकारी कामात लाचेची अडवणूक होत असेल तर 10 64 या टोल फ्री नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून केले आहे तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.


शेअर करा