इंडियन कंजूमर इकॉनोमी 360 चा धक्कादायक आर्थिक सर्व्हे समोर , काय आलंय समोर ?

शेअर करा

देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात महागाई तसेच बेरोजगारी वाढलेली आहे. एकीकडे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत तर दुसरीकडे वाढती महागाई आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. बहुतांश सर्वच गोष्टींचे भाव हे तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढलेले असून त्यामुळे नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत अशातच इंडिया कंजूमर इकॉनोमी 360 यांचा सर्वे आलेला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत.

इंडियन कंजूमर इकॉनोमीच्या सर्वेत म्हटल्याप्रमाणे गरिबांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांची घट झालेली आहे तर मध्यमवर्गीय नागरिकांच्या उत्पन्नात देखील दहा टक्के घट झालेली दिसून आल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर धक्कादायक बाब म्हणजे श्रीमंत नागरिकांच्या उत्पन्नात तब्बल 40% वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी एक ट्विट केलेले असून त्यामध्ये ‘ ग़रीब वर्ग की आमदनी: 50% घटी मिडिल क्लास: 10% तक गिरी.. अमीर वर्ग: 40% बढ़ी चाहे जनता को महंगाई, बेरोज़गारी कितना भी तड़पाए, ‘सूट-बूट सरकार’ का एक ही टारगेट – ‘मित्रों’ की तिजोरी भरती जाए। ‘ असे म्हटलेले आहे.

केंद्र सरकारकडून सध्याच्या परिस्थितीचा अमृत काल म्हणून अनेकदा उल्लेख करण्यात आलेला आहे तर त्यावर काँग्रेसने हा अमृतकाल नव्हे तर मित्रकाल आहे. मित्रकालात केवळ मित्राच्या हिताचा उद्देश हाच विचार घेऊन भाजप काम करत असल्याची टीका केलेली आहे. अडाणी यांच्या कथित आर्थिक घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एक शब्द देखील उच्चारला नाही तर दुसरीकडे सातत्याने चीनकडून चिथावणी दिली जात आहे तरीदेखील मोदी यांनी मौन बाळगल्यावरून देखील त्यांच्या विरोधात विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे तर गोदी मीडिया या मुद्यांकडे लक्ष देत नाही.


शेअर करा