
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत अशीच एक घटना पुणे परिसरात उघडकीला आली असून उत्तर प्रदेशातील तरुणींना नोकरी देतो असे सांगून पुण्याला हॉटेलमध्ये आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका टोळक्याचा पोलिसांनी सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केलेला आहे. पुणे मुंबई रोड वरील आंबेगाव येथील ब्रह्मा पॅलेस या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी कारवाई करत दोन तरुणीची सुटका केली तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 2 व्यक्तींना अटक केली आहे.
विपुल बाबासाहेब बेलदरे ( वय 36 राहणार भैरोबा मंदिराशेजारी आंबेगाव ) आणि विक्रम करण शोनार ( वय 24 राहणार ब्रम्हा लॉज आंबेगाव ) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत तर त्यांचे साथीदार संजय प्रसाद महातोदार आणि त्याच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विपुल हा हॉटेल मालक असून विक्रम हा त्याचा व्यवस्थापक आहे. आंबेगाव येथील ब्रह्मा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी आधी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली.
बनावट ग्राहक पाठवल्यानंतर त्याने इशारा करताच छापा टाकण्यात आला त्यावेळी विपुल बेलदरे आणि विक्रम सोनार हे 20 आणि 21 वर्षाच्या उत्तरप्रदेशातील तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. पीडित तरुणींना हिंजवडी येथील कम्फर्ट इन या हॉटेलमध्ये ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून इथे वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.
उत्तर प्रदेशातून त्यांना काम देण्याच्या आमिषाने पुण्यात आणण्यात आले होते मात्र पुण्यात आल्यावर त्यांच्याकडून हा प्रकार केला करून घेतला जात होता . पीडित तरुणींची परवानगी सुधारणा सुधारगृहात करण्यात आलेले असून ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश पुरानीक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर आदींच्या पथकाने केली आहे.