‘ एवढे तास कुठे निजला होतात ‘ जीभ घसरलेल्या आशिष शेलारांना किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर

शेअर करा

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी हा माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान असल्याचा आरोप केला असून एका महिला पदाधिकाऱ्याविषयी शेलार यांनी ‘ आक्षेपार्ह ‘ शब्द वापरल्याचे म्हटले असून पोलीस तक्रार करत असल्याचंही नमूद केलं.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ?

३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी ४ महिन्यांच्या बालकाची प्रकृती गंभीर असल्याने बाळ दगावले. यानंतर वडिलांचेही निधन झाले. या घटनेबाबात ४ डिसेंबरला आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात असे वक्तव्य केले.

मुंबईचे महापौर प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. महिला महापौर असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यांचा मी निषेध व्यक्त करते. त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. त्यामुळेच मी त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवत आहे

आशीष शेलार म्हणतात की ?

महापौर व महिलांचा अवमान केल्याची तक्रार महिला आयोग, पोलिसांकडे जे करीत आहेत, त्यांनी पत्रकार परिषद एकदा निट पूर्ण ऐकावी. मी जे बोललोच नाही, ते महापौरांशी जोडून हेच महापौरांचा अवमान करीत आहेत. जाणीवपूर्वक सत्याकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर मलाही कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल. ७२ तास तुम्ही का पोहचला नाही ? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात ? झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय ?


शेअर करा