ओबीसी मेळाव्यात शिवसेना नेत्याचे पाकीट मारणारा अखेर ताब्यात

शेअर करा

राज्यात सामान्य व्यक्तीचे पाकीट मारणे ही एक साधारण घटना समजली जाते मात्र ज्यावेळी एखाद्या नेत्याच्या खिशातून पाकीट मारले जाते त्यावेळी मात्र सदर घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात होते अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेली असून शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्या खिशातून व्यासपीठावर लोकांच्या देखत 50 हजार रुपये एका चोरट्याने लंपास केले होते.

पोलिसांनी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत या भामट्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडील त्रेचाळीस हजारांची रोकड जप्त करून त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, स्वप्निल मारुती घुले ( वय 23 राहणार सांगोला ) असे त्याचे नाव असल्याचे समजते. स्वप्निल घुले हा खिशातून पैसे चोरताना कॅमेऱ्यात कैद झालेला होता. सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यात त्याने केलेले धाडसी चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याच्या आधारे सांगोला येथील रहिवासी असलेला स्वप्नील याला मिरज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


शेअर करा