औकात काढणाऱ्या पंकजा मुंढेंना धनंजय मुंढे म्हणाले की ?

शेअर करा

बीडमध्ये सध्या धनंजय मुंढे आणि पंकजा मुंढे यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळते आहे. पंकजा मुंढे यांच्या टीकेनंतर धनंजय मुंढे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आष्टी नगपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आयोजीत केलेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आणि या निवडणुकीमध्ये आष्टीत परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले धनंजय मुंढे ?

आमच्या ताईसाहेबांनी माझी औकात काढली. एखाद्या गावच्या विकासकामांसाठी पालकमंत्री म्हणून मी जर ५० किंवा १०० कोटींची घोषणा करत असेल तर तुम्ही आमची औकात काढणार का ?. तुम्ही तर पाच वर्ष राज्याच्या सत्तेत होता, केंद्राच्या सत्तेत होता, जिल्ह्याच्या पालकमंत्री होता, तरीसुद्धा विकासासाठी पैस देण्याची औकात तुम्ही का दाखवली नाही ? . २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी पालकमंत्री, महिला बाल कल्याणमंत्री, जलसंधारणमंत्री अशा तीन चार पदे असलेल्या मंत्र्याचा ३२ हजार मतांनी पराभव करुन माझी औकात दाखवून दिली आहे.

गेल्या २५ वर्षात मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद विधानसभा, लोकसभा या वेगवेगळ्या निवडणुका पाहिल्या. पण आता जी नगरपंचायतची निवडणूक चालू आहे, अशी निवडणूक मी कधीच बघितली नाही. देशात शत प्रतिशत भाजप निवडणूक लढते आहे, तर मग आष्टीत तीन ठिकाणी कमळ चिन्हावर निवडणूक का लढवली जात नाही?


शेअर करा