औरंगाबादच्या वाळूज येथील पडक्या वाड्यातील मृतदेहाची ‘ मर्डर मिस्ट्री ‘ सुटली

शेअर करा

औरंगाबाद नजीक वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पडक्या वाड्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडालेली होती मात्र क्लू मिळताच पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत आरोपीस जेरबंद केले असून त्याचा खून हा सख्ख्या भावाने केला असल्याचे समोर आले असून आरोपीच्या बहिणीने याबद्दल पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे . अमोल रोहिदास वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा भाऊ गणेश रोहिदास वानखेडे आणि गणेशचा मित्र सुमित विजय सुतार यांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमोल रोहिदास वानखेडे याला दारूचं व्यसन होतं आणि त्यातून तो घरातील सर्वाना त्रास देत होता. आरोपी गणेश हा रोजच होणाऱ्या भावाच्या त्रासाला कंटाळला होता म्हणून त्याने भावाची हत्या करण्याचा कट रचला आणि या कटात त्याने आपल्या दोन मित्रांना देखील सामील करून घेतलं. औरंगाबादमधील हनुमान नगर येथील आपल्या घरात आरोपीनं मित्राच्या मदतीने भावाचा खून केला.

खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा त्याच्यापुढे प्रश्न होता म्हणून त्यांनी मृत अमोलचा मृतदेह वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पडक्या वाड्यात नेऊन टाकला. 7 डिसेंबर रोजी घडली होती आणि त्यानंतर कित्येक दिवस उलटले तरी पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. आरोपीने आपल्या बहिणीकडे जाऊन आपण अमोल याचा खून केल्याची कबुली दिली आणि तपासाला दिशा मिळाली. आरोपीच्या बहिणीने सिल्लोड पोलिसांकडे खुलासा केला आणि पोलिसांनी कारवाई करत आरोपीस जेरबंद केले आहे.

एक जानेवारी रोजी म्हणजेच जवळपास 25 दिवसांनी वाळूज पोलिसांना बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता मात्र कोणताच पुरावा नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले होते मात्र बहिणीने अखेर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या असून अन्य एक आरोपी फरार असल्याचे समजते .


शेअर करा