औरंगाबाद अपहरण कांडात ‘ दुसरा ‘ अँगलही आला समोर..

शेअर करा

आजकाल पैशासाठी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही अशीच एक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आली असून दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणाचे अपहरण करण्यात आले होते मात्र उस्मानपुरा पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासाची चक्रे फिरवून त्यांना बेड्या ठोकल्या तर अपहरण केलेल्या युवकाची सुखरूप सुटका केली.

शामराव सिताराम पवार ( वय 54 राहणार अंबड चौफुली जालना ) व शेख फय्याजउद्दीन शेख मेहराजउद्दीन ( वय 23 राहणार शंकर जिन जालना ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मधुकर अवचरमल ( राहणार रामनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री दहा वाजता त्यांना पवार आणि फय्याज नावाच्या व्यक्तीने फोन करून तुमचा मुलगा किशोर ( वय 35 ) याला जालना येथे घेऊन आलेलो आहे. मुलगा हवा असेल तर सकाळी दहा वाजेपर्यंत दहा लाख रुपये घेऊन या असा त्यांना दम दिला.

फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ व पथक जालना येथे रवाना झाले आणि त्यांनी अपहरण केलेल्या युवकाची पवार आणि शेख यांच्या ताब्यातून सुटका केली. प्राथमिक माहितीनुसार किशोर यांनी नातलगाला नोकरी लावण्यासाठी शामराव यांच्याकडून पैसे घेतले होते मात्र नोकरी लागली नाही म्हणून किशोर याने पैसे देण्यात टाळाटाळ सुरू केली त्यामुळे पैशाची वसुली करण्यासाठी त्यांनी अपहरणाची शक्कल लढवली, अशी माहिती त्यांनी पोलिस चौकशीत दिलेली आहे.


शेअर करा