औरंगाबाद हादरले..उच्चभ्रू महिलेच्या हातातूनच बाळच घेतले हिसकावून

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली असून पतीसोबत झालेल्या वादामुळे प्राध्यापक असलेल्या महिलेने तक्रार निवारण केंद्रात अर्थात भरोसा सेल येथे तक्रार दिल्याने संतापलेल्या पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या ताब्यातील दोन वर्षांचे बाळ हिसकावून घेण्याची घटना समोर आलेली आहे. सदर प्रकारामुळे या मातेची तब्बल 20 दिवसांनी बाळासोबत भेट झाली त्यानंतर हे बाळ तिच्या ताब्यात देण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेल्या मुकुंदवाडीतील व्यक्तीसोबत एका अभियांत्रिकी विद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक असलेल्या महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार झाल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणातून भांडणे सुरू झाली मात्र दरम्यानच्या काळात त्यांना अपत्यप्राप्ती झाली होती.

काही दिवस संसारात तडजोड केल्यानंतर प्राध्यापिकेने पतीच्या विरोधात भरोसा सेलकडे धाव घेतली त्यामुळे प्रकरण पोलिसात गेल्यामुळे संतापलेल्या पतीने दोन वर्षाचे बाळ पत्नीकडून हिसकावून घेत स्वतःच्या ताब्यात ठेवले. त्यानंतर प्राध्यापक असलेल्या महिलेने भरोसा सेल गाठत बाळ मिळवण्यासाठी नियंत्रण कक्षात धाव घेतली होती. दामिनी पथकाने प्राध्यापक महिलेला धीर देत तिचे बाळ तिला परत मिळवून दिल्याने भरोसा सेलच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा