औरंगाबाद हादरले..कमरेपासून वर कापलेला मृतदेह गोणीत सापडला

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आलेली असून दहेगाव शिवारात कमरेपासून अर्धे कापलेले इसमाचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजता ही घटना उघडकीला आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहेगाव शिवारातील तलावाच्या बाजूला खताच्या गोणीत प्रेत असल्याची माहिती समजताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. दहेगाव शिवारातील जामेडी दहेगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ एका गोणीला कुत्र्यांनी फाडले असता हा प्रकार समोर आला आणि त्या गोणीत एका पुरुषाचे प्रेत असल्याचे दिसून आले.

पोलीस आल्यानंतर गोणी उघडून बघितली असताना एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये बांधून खताच्या गोणीमध्ये कमरेपासूनवर असलेले प्रेत होते. कमरेखालील भाग कुठे आढळून येतो का ? याचा पोलिसांनी शोध घेतला मात्र वृत्त लिहीपर्यंत तो आढळून आला नव्हता. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून पोलिसांनी सदर प्रकरणाचा शोध सुरू केला आहे.

घाटमाथ्यावर डोंगररांगा आणि गौताळा अभयारण्य असल्याने खून करून मृतदेह फेकून देण्याच्या घटना या आधी देखील घडलेल्या आहेत. शनिवारी उघडकीस आलेल्या या व्यक्तीची ओळख पटवून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.


शेअर करा