औरंगाबाद हादरले..माहेरी आलेली नवविवाहिता प्रियकरासोबत झाली फरार, आता म्हणतेय की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना औरंगाबाद इथे उघडकीस आली आहे . लॉकडाऊनच्या काळात मोठा गाजावाजा करून आईवडिलांनी तिचे लग्न लावून दिले मात्र काही काळ पतीसोबत राहिल्यानंतर ती एके दिवशी घरातील सर्व सुमारे १५ तोळे दागीने घेऊन घरातून फरार झाली.

सासर आणि माहेरच्या लोकांनी तिचा शोध घेतला असता ती तिच्या प्रियकरासोबत दुसरा विवाह करून राहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली . पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र ती महिला आता आपल्या प्रियकरासोबतच राहण्यास इच्छुक असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार , पैठण तालुक्यातील बिडकीन येथील एका युवकाचा विष्णूनगर इथे लॉकडाऊनच्या काळात धार्मिक पद्धतीने विवाह चांगला धूमधडाक्यात झाला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी गेली आणि पुन्हा दिवाळीसाठी माहेरी आली होती. १९ नोव्हेंबर रोजी पती माहेरी तिला भेटले. त्याच्या दुसऱ्या दिवशी विवाहिता सासरी पतीसोबत सासरी जाणार होती.

सासरी जाण्याच्या आदल्याच दिवशी ती विष्णूनगरातून गायब झाली. तिने तिच्या लग्नात घातलेले १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. हतबल पती यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस तपास सुरु असताना पत्नी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटीगाव येथे आपल्या प्रियकरासोबत संसार थाटून राहत असल्याची माहिती मिळाली आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

पोलीस ठाण्यात आल्यावर या पत्नीने चक्क आपण प्रियकरासोबत सुखाने राहत असून सासरी जाण्याचा आपला विचार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याने पोलिसही हतबल झाले . पहिले पती यांनी पहिल्या लग्नात घातलेले १५ तोळे सोने घेऊन पोबारा केला अशी फिर्याद दिल्यावर पत्नीसह तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार भाऊराव गायके करीत आहेत.


शेअर करा