औरंगाबाद हादरले.. शिक्षक पतीने गाठला अमानुषतेचा कळस, सासऱ्याने देखील दिली साथ

शेअर करा

शिक्षक म्हटलं की शांत आणि संस्कारी अशी प्रतिमा आपल्यासमोर येते मात्र या प्रतिमेला छेद देणारी एक घटना औरंगाबाद इथे उघडकीस आली असून दारूचे व्यसन असलेल्या शिक्षकाने केलेला प्रकार पाहून तुम्हालाही राग आल्याशीवाय राहणार नाही . दारूचे व्यसन असलेला पती त्याच्या भावासोबत दारू पिऊन आल्यानंतर पत्नीला रोज शिवीगाळ करायचा पण यावेळी सासऱ्यानेही क्रूरतेच्या मर्यादा पार केल्याने हतबल पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. रितेश जोशी असे या दारुड्या पतीचे नाव असून तो शिक्षक आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश जोशी हा आपला भाऊ असलेला रुपेश याच्यासोबत रोज दारू प्यायचा आणि घरी पत्नीला शिविगाळ करायचा मात्र आता चक्क सासऱ्यानेही सुनेला बेदम मारहाण केली आणि तिचे केस धरून तिला भिंतीवर ढकलून दिले. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील नवजीवन कॉलनीत ही घटना घडलेली असून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर शहरात राहणाऱ्या रितेश शरद जोशी याला दारूच व्यसन असल्याने तो रोज दारू पिऊन पत्नीला त्रास देत असे.गुरुवारी पत्नी आश्विनी घरात बसल्या असताना पती रितेश जोशी आणि दिर रुपेश दोघेही दारु पिऊन घरात येताच अश्विनी यांना शिवीगाळ करू लागले. अश्विनी यांची काहीही चूक नसताना चक्क सासर्‍याने देखील अश्विनी यांचे केस धरून भिंतीवर ढकलून दिले तर पती रितेशने कमरेच्या ब्लेटने मारहाण करायला सुरुवात केली.

पती आणि सासऱ्याच्या या अमानुष मारहाणीत अश्विनी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर वैजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर अश्विनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात पती, दिर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


शेअर करा