
आजकाल चोरी करण्यासाठी भामटे कुठली शक्कल लढवतील याचा काही नेम राहिलेला नाही. आत्तापर्यंत सराफाच्या दुकानावर पुरुष चोरांनी डल्ला मारलेला पाहायला मिळालेला आहे मात्र आता चक्क महिलादेखील सराफाच्या दुकानावर हात साफ करण्यात पाठीमागे नाहीत हेही समोर येते आहे. नाशिक येथील सराफा बाजारात अशीच एक घटना घडली आहे.
भगीरथी ज्वेलर्स नावाच्या दुकानात नऊ तारखेला सकाळी साडेअकरा वाजता तीन महिला खरेदीसाठी आल्या होत्या. दुकानदार मोबाईल वर बोलत असल्याचा फायदा घेत त्यांनी कर्णफुलांच्या तीस जोड्या लंपास केले आहेत. सराफ व्यावसायिक संजय दंडगव्हाण ( वय 53 गोरेराम लेन ) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. महिलांचा हा कारनामा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला असून त्याच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
सराफ बाजारात दंडगव्हाण यांचे सराफी दुकान असून बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले असता दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन महिलांनी प्रवेश केला. त्यांच्यासोबत एक लहान मुलगी देखील होती. महिलांनी स्कार्प बांधलेला असल्याने त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला नाही. खरेदीचा बनाव करत संशयित महिला चोरांनी दागिन्यांवर डल्ला मारला त्यावेळी ते फोनवर बोलत होते.
मालक फोनवर बोलत आहेत हे पाहून त्यांचे लक्ष विचलित होतात. महिलांपैकी एका महिलेने ड्रावरमध्ये हात घालून सोन्याची अंगठी आणि एक ते तीन ग्रॅम वजनाचा पर्यंतचे सुमारे चार लाख रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले गायब केली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून पोलीस या महिलांचा शोध घेत आहेत.