
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीस आली आहे. मुंबईतील अंधेरी येथे दीपा बार येथे अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळताच समाजसेवा शाखेने तिथे छापा टाकला मात्र अवघ्या काही सेकंदात बारबाला गायब झाल्या. समाजसेवा शाखेने पूर्ण बार पिंजून काढला मात्र तरीदेखील या बारबाला आढळून आल्या नाहीत.
बारबालांना पळून जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसताना ह्या गायब झाल्या कशा ? असा अधिकाऱ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी या डान्सबारचा कप्पा कप्पा शोधण्यास सुरुवात केली. समाजसेवा शाखेने पूर्ण बार पिंजून काढला मात्र तरीदेखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. अखेर पोलिसांची नजर एका भल्यामोठ्या आरशाकडे गेली आणि त्या आरशाचा आकार हा नेहमीपेक्षा व गरजेपेक्षा मोठा आढळून आल्याने पोलिसांनी आरशावर हातोडा मारला असता काच खाली पडली आणि त्यामागे असलेल्या बारबाला या टपाटपा बाहेर पडू लागल्या .
दीपा आर्केस्ट्रा बारमध्ये समाजसेवा शाखेच्या पथकाने अकरा तारखेला आधी छापा टाकला होता मात्र नेहमीप्रमाणे हाती काही लागले नाही म्हणून पथकाने रविवारी रात्री पुन्हा शोध घेतला त्या वेळी अखेर तळघरात असलेल्या आरशाकडे पाहून संशय आल्याने पथकाने आरशावर हातोडा मारला असता आरशाच्या पाठीमागे असलेली खोली देखील पोलिसांच्या लक्षात आली. तिथे लपून बसलेल्या 17 बारबालांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच आर्केस्ट्रामधून बारबालांना पळून जाण्यासाठी भुयारी मार्ग देखील बनवण्यात आला होता.
जवळपास पंधरा तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी सतरा बारबाला आणि बारच्या मॅनेजर सह 28 जणांवर कारवाई केली आहे तर या कारवाईत सव्वा लाख रुपयांच्या रोकड सहीत एक लॅपटॉप व दोन मशीन जप्त करण्यात आली आहेत.