किरकोळ कारणावरून सुनेचा खून करणाऱ्या सासऱ्याला न्यायालय म्हणाले ?

शेअर करा

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणारा कोल्हापूर जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख आहे मात्र इथेच पन्हाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीला आली होती. सासूला गरम पाणी आंघोळीला दिले नाही म्हणून सासर्याने चक्क सुनेचा खून केला होता. या प्रकरणी सासर्‍याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग दशरथ सातपुते ( वय 74 राहणार मल्हारपेठ तालुका पन्हाळा ) असे त्याचे नाव आहे.

पांडुरंग सातपुते हा मल्हारपेठ पन्हाळा येथे राहत होता. त्याने 14 फेब्रुवारी 2018 रोजी पत्नीला गरम पाणी दिले नाही या रागातून सून शुभांगी सातपुते हिच्या डोक्यात हातावर पायावर गंभीर वार करत तिला ठार मारले आणि नातू याच्या डोक्यात देखील लोखंडी पळीने वार करून त्यालादेखील ठार मारण्याचा प्रयत्न केला मुलगा रमेश पांडुरंग सातपुते याने सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

न्यायालयात सदर प्रकरण सुरू होते त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पांडुरंग सातपुते याला दोषी ठरवले आहे आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.


शेअर करा