कोरोना चीनमध्ये पण भारतात म्हणून झाली औषधे महाग

शेअर करा

कोरोना

चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर कोरोना साथीचा प्रचंड उद्रेक झालेला असून दिवसाला सुमारे दहा लाख नागरिक कोरोनाची शिकार होत आहेत . चीनमधून भारतात औषध उद्योगासाठी लागणारा कच्चामाल येत असल्याने आता कच्चामाल येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. औषधांच्या किमती त्यामुळे बारा ते 25 टक्क्यांनी वाढल्या असून देशात कोरोनाचा उद्रेक झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची देखील शक्यता आहे.

औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चामाल हा मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करण्यात येतो त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करून औषधे बनवली जातात मात्र सध्या चीनमध्येच औषधांची मोठी गरज असून देशाबाहेर जाणाऱ्या कच्च्या मालावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत त्यामुळे भारतात येणाऱ्या कच्च्या मालाची आवक कमी झालेली आहे.

कोरोनामुळे चीनमधील कामावर जाणारे नागरिक देखील कमी झालेले असून त्यामुळे उत्पन्नावर देखील परिणाम झालेला आहे. भारतातील अनेक मोठ्या फार्मासिटिकल कंपन्या चीनच्या मालाच्या भरोशावर असून देशात कोरोना वाढला तर परिस्थिती अत्यंत भीषण होण्याची शक्यता आहे.


शेअर करा