खंडणीप्रकरणी फरार असलेले परमबीर सिंह यांच्याबद्दल ‘ मोठी बातमी ‘

शेअर करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या फरार असून ते कुठे आहेत याविषयी कुणालाच काही माहित नाही मात्र परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी ठाण्यातील न्यायालयानं आज अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही क्षणी अटक केली जाण्याची टांगती तलवार आहे .

परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवून १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते मात्र ते हजर झाले नाहीत. आता गुन्हे शाखेने सिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी अर्ज केला होता त्यानुसार न्यायालयाने गुन्हे शाखेच्या अर्जावर सुनावणी करताना परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे .

गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


शेअर करा