‘ खाजखुजली ‘ ची अशी आयडीया वापरायचे की , पोलिसही हैराण

शेअर करा

चोरी आणि फसवणूक करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही, अशीच एक घटना सांगली येथे समोर आलेली असून दुचाकी आधी पंचर करायची आणि लक्ष विचलीत करण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंगावर खाजखुजली निर्माण करणारी पावडर टाकून त्याची बॅग पळवून न्यायची अशा प्रकाराने चोरी करणाऱ्या दोन जणांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, उदय बापू भोई ( वय 20 ) व सुरेश श्रीनिवास कुंभार ( वय 28 दोघेही राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे मूळ कर्नाटक ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एका दुचाकीसह 64 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दोघेही संशयित गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील विटा येथे वास्तव्याला होते. या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात तीन तर कोल्हापूर जिल्ह्यात एक गुन्हा केलेला आहे. अशाच पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात देखील चोऱ्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


शेअर करा