गर्भवती सनाचा ‘ हा ‘ व्हिडीओ तुमच्यापर्यंत आलाय का ? जाणून घ्या काय घडलंय

शेअर करा

अभिनेत्री असलेली आणि धार्मिक भूमिकेवरून चर्चेत आलेली सना खान ही काही दिवसातच आई होणार असून तिने तिचा पती असलेला मुफ्ती आनस याच्यासोबत एका पार्टीला हजेरी लावली होती. पार्टीतील तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये तिचा पती तिचा हात धरून तिला पटापट चालण्यासाठी ओढत असल्याचे दिसून येत आहे . सना गरोदर असल्याने तिला असे नेणे योग्य नाही अशा प्रतिक्रिया तिच्या पतीबद्दल येत असून सना हिचे चाहते तिच्या पतीवर चांगलेच भडकलेले आहेत.

सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला असून त्या व्हिडिओमध्ये मुफ्ती आनस सनाचा हात पकडून पटापटा पुढे चालताना दिसून येत आहे . सनादेखील चालण्याचा प्रयत्न करते मात्र ती गरोदर असल्याकारणाने त्याच्या बरोबरीने चालू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत असून तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाईट वाटलेले दिसून येत आहे.

सना खान हिने 2020 मध्ये चित्रपट क्षेत्राला कायमचा रामराम केलेला होता आणि त्यानंतर मुफ्ती आनससोबत तिने निकाह केलेला होता . मागील एका मुलाखतीत तिने आपण गरोदर असल्याचे सांगितले होते त्यामुळे तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचा पती मुफ्ती आनस याच्यावर संताप व्यक्त केला जात असून रमजानच्या पवित्र महिन्यात तरी गर्भवती बायकोची व्यवस्थित काळजी घे. पवित्र महिन्यात देखील तू काळजी घेऊ शकत नसशील तर उपवासाचा काय फायदा असे एकाने म्हटले आहे तर दुसऱ्याने जर सनाला सर्वांसमोर अशी वागणूक देत असेल तर घरात तिची तू काय किंमत ठेवत असशील ? अशा देखील प्रतिक्रिया त्याला येत आहेत.


शेअर करा