गुजरातच्या तरुणाच्या पिशवीत ‘ नको ‘ त्या वस्तू , पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात व्यसनाधीनतेचे प्रमाण तरुणाईमध्ये पसरत असल्याचे दिसून येत आहे . प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात असली तरीदेखील व्यसने करणाऱ्या तरुणांना नशेसाठी औषधे देखील उपलब्ध होतात. असाच एक प्रकार धुळे जिल्ह्यात समोर आलेला असून नशा आणणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्या एका कापडी पिशवीत घेऊन विक्रीसाठी सुरत येथील एक तरुण आला होता मात्र त्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

सदर तरुण हा गुजरातचा असून त्याचे नाव आमीन शेख लाल शेख ( वय 29 राहणार कुमार वाडा गांधीनगर सुरत ) असे असल्याचे समजते. लोकमान्य हॉस्पिटल परिसरात हा तरुण कापडी पिशवीत गुंगी आणणाऱ्या औषधांच्या बाटल्या घेऊन येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

कापडी पिशवीत काय आहे ? असे विचारतात त्याची भंबेरी उडाली म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पिशवीची तपासणी सुरू केली त्यावेळी त्याच्या पिशवीत गुंगी आणणाऱ्या तब्बल 42 हजार रुपये किमतीच्या या तीस बाटल्या आढळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी तरुण हा गुजरात येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात पोलीस कर्मचारी इंद्रजीत वैराट यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


शेअर करा