
सबसे कातील गौतमी पाटील हिच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे हा प्रकार समोर आलेला आहे. सोशल मीडियात गौतमी पाटील चांगलीच चर्चेत असून जिथे जिथे तिचा लावणीचा कार्यक्रम असेल तिथे मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांची गर्दी होत असते. बार्शी येथे कार्यक्रम आयोजन करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गायकवाड यांनी पोलिसांची परवानगी या कार्यक्रमाला घेतली नसल्याची देखील माहिती आहे.
बार्शी इथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 12 मे रोजी हा कार्यक्रम झाला त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक असलेले प्रजाशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
कार्यक्रम या दिवशी घडला त्या दिवशी पोलिसांनी आयोजक यांना गौतमी पाटील हिचा शो बंद करण्यास लावलेले होते त्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला आणि अवघ्या एका गाण्यावर गौतमी पाटील हिने डान्स केला त्यानंतर तिनेच आपली फसवणूक केलेली आहे असा आरोप करत आयोजक यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कारण देताना त्यांनी गौतमी पाटील ही कार्यक्रमाला ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचली नाही असे कारण पुढे केलेलं असून आयोजक यांच्या म्हणण्याप्रमाणे सशुल्क पोलीस बंदोबस्त मिळण्यास आपण अर्ज केलेला होता मात्र पोलिसांनी त्यासाठी अतिरिक्त कागदांची मागणी केली होती असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
गौतमी पाटील ही वेळेत पोहोचली नाही त्यामुळे रात्री उशीर झाल्यामुळे लवकरच कार्यक्रम बंद करण्यात आला. कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक आलेले होते त्यांची देखील निराशा झाली तर आयोजक यांची देखील नाचक्की झाली त्यामुळे आयोजक असलेले गायकवाड यांनी गौतमी पाटील यांच्याकडून आपली फसवणूक झालेली आहे असा दावा केलेला असून तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.