घराबाहेर पडताना ‘ इथे ‘ किल्ली ठेवताय का ? चोरट्याने साधलाय डाव

शेअर करा

अनेक नागरिक घराबाहेर पडताना कुलूप लावून जायचे असेल आणि जर घरी घरातील कोणी व्यक्ती येणार असेल तर चावी लपवण्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधत असतात त्यातील हक्काची जागा म्हणून बुटाचा वापर केला जातो मात्र चोरट्यांना देखील आता असे प्रकार लक्षात येत असून अशाच पद्धतीने चोरी केल्याचा एक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीला आलेला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक रोडला कार्यक्रमासाठी गेल्याची संधी साधत चोरट्याने चावी घेतली आणि घरात प्रवेश करत स्वयंपाक खोलीतील डब्यात ठेवलेले पाच तोळे सोन्याचे दागिने, पावणेतीन लाखांची रोकड आणि पाच लाख 34 हजार रुपयांचा ऐवज घेऊन मोठी घरफोडी केली आहे.

सदर प्रकरणी माडसांगवी येथील राहणारे विष्णू लक्ष्मण मुंडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून 14 तारखेला आंबेडकर जयंती असल्याने कुटुंब नाशिक रोडला गेले होते मात्र रात्री उशीरा परतल्यानंतर त्यांनी स्वयंपाक खोलीत प्रवास प्रवेश केला असता डबे खाली जमिनीवर उघडे पडलेले दिसले आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड तब्यात नसल्याचे आढळून आले. त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी पाहणी करत केली असून केली मुंडे यांच्या घरात सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड चोरी केल्यानंतर चोरट्याने किल्ली पुन्हा त्याच बुटांमध्ये ठेवलेली होती तसेच घरातील कपाट किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावल्याने हा चोरटा परिचयाचा किंवा मुंडे यांच्या कुटुंबाची व्यवस्थित माहिती असणारा असावा असे देखील शक्यता निर्माण झालेली आहे.


शेअर करा