
देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशात समोर आले असून बांदा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या या मुलीच्या वडिलांनी शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवल्याचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हे प्रेमपत्र स्वतःच्या मुलीच्या मदतीनेच शिक्षिकेला पाठवलेले होते. शिक्षिकेने अखेर पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
पीडित शिक्षिकेने म्हटल्याप्रमाणे, शाळेत शिकणार्या एका मुलीचा पिता आपल्याला सतत त्रास देतो . रस्त्यात अडवून आपली छेड काढतो तसेच विरोध केला तर पैशाची मागणी करतो. त्याला शाळेत बोलावून अनेकदा त्याची समजूत देखील काढण्यात आलेली आहे मात्र त्याच्या वागण्यात कुठलाही बदल झालेला नाही. बुधवारी आरोपी शाळेच्या जवळ शस्त्र घेऊन फिरत होता म्हणून आपण या संदर्भात गिरवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे असे म्हटले आहे. सदर प्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती आहे.