
महाराष्ट्रात बॉलिवूड असल्याने अनेक जणांना महाराष्ट्र आणि पर्यायाने मुंबईचे आकर्षण असते. आपल्या करियरला मुंबई येथे चांगला स्कोप मिळू शकेल या आशेने अनेक जण मुंबईच्या दिशेने पाऊल ठेवतात मात्र तेलंगाना हैदराबादची एक तरुणी गायक बनण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाली होती मात्र नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिचे मतपरिवर्तन करत तिला परत तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
हैदराबाद येथील अमर पेठ पोलीस ठाण्यात राजेश अशोक सुलाखे ( राहणार अमर पेठ हैदराबाद तेलंगणा ) यांची एकोणीस वर्षाची मुलगी शुभांगी ही बेपत्ता झाली होती. तिचा शोध हैदराबाद पोलीस घेत असतानाच ती सापडली नाही. याच दरम्यान मोबाईलवरून तिचे दुसरे लोकेशन ठाणे येथे असल्याचे पोलिसांना समजले याने हैदराबाद पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे पोलिसांची मदत मागितली. नाशिक रोड पोलिसांनी संबंधित तरुणीचा मोबाईल फोन ट्रॅक करत दिला शोधून काढले आणि तिची समजूत काढून तिला तिच्या पालकांच्या हवाली केले.
गायक होण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर तिच्याकडील पैसे संपल्याने ती ठाणे येथून नाशिक रोडला आली आणि त्रिंबकेश्वर येथे दर्शनासाठी चालली होती. तिथून परतत असताना पोलिसांनी तिला विश्वासात घेतले आणि विचारले असताना आपण वडिलांच्या भीतीने घरी जात नाही असे तिने सांगितले.
रेल्वे पोलीस हवालदार संतोष उखाडे यांनी कोणाला मोबाईल फोन केल्यावर ‘ जय बजरंग ‘ असे म्हणत या तरुणीला विश्वासात घेतले त्यावेळी तिने तुम्ही बजरंग दलाचे आहात का असे विचारले ? उखाडे यांनी हो म्हटल्यानंतर या तरुणीला विश्वास बसला आणि ती बसस्थानकावर आली. अखेर तिला मुंबईची वस्तुस्थिती सांगितली आणि वडील तुला आता मारणार नाही असे असा विश्वास देत पुन्हा तिच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.