
पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुव्यवस्था इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरी असली तरी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका गरीब महिलेच्या महिलेची आणि तिच्यासोबत आलेल्या तिच्या पतीची परिचारिका यांनी दुर्लक्ष केल्यामुळे चांगलीच फरफट झालेली असून त्यानंतर अखेर प्रसुती पक्षाच्या बाहेरच महिलेची प्रसूती झालेली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली असून जेजुरी देवस्थानचे स्वच्छता विभागात कर्मचारी म्हणून सेवेत असलेले मच्छिंद्र दोडके यांच्या पत्नीच्या पोटात कळा येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी धाव घेतली होती. तेथील परिचारक असलेल्या गायकवाड यांनी प्रसूतीसाठी चार तास मात्र लागतील असे सांगितले मात्र त्यानंतर कळा थांबत असल्याने मच्छिंद्र दोडके हे त्यांना वारंवार तात्काळ प्रसूतीसाठी आग्रह करत होते मात्र परिचारिका यांनी दुर्लक्ष केले आणि अखेर प्रसुती कक्षाच्या बाहेरच त्यांच्या पत्नी कोसळल्या आणि तिथे त्यांची प्रसूती झाली. सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे .
परिचारिका गायकवाड, एक शिकाऊ डॉक्टर आणि इतर रुग्णांनी त्यांना बेडवर उतरवून ठेवले आणि त्यानंतर फरशीवर सांडलेले रक्त देखील त्यांच्या पतीलाच पुसण्यास सांगितले तर दुसरीकडे हलगर्जीपणामुळे लवकर प्रसूती झाल्यामुळे रक्तस्राव देखील थांबत नव्हता त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेच्या चालकाने आपल्याला मदत केली असे देखील त्यांनी म्हटलेले असून ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणा समोर आला असून यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी देव संस्थान व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना एक अर्ज लिहून केलेली आहे