जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी पोलिसच बनले ‘ मुन्नाभाई ‘ डॉक्टर , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा इथे समोर आलेली आहे एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाला डॉक्टर बनावे लागले आणि अत्यंत फिल्मी स्टाईलने एका संशयितासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलीचे पालक ऊस तोडणीसाठी बाहेर गेलेले असताना ती घरी एकटीच होती. याचा फायदा घेत 26 जून २०२१ रोजी नंदू सुभाष सोनवणे नावाच्या 24 वर्षीय तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले होते. सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपली यंत्रणा कार्यरत केली आणि या मुलीला शोधून काढण्याचे आव्हान म्हणून स्वीकारले.

थाळनेर येथून मुलीच्या वडिलांना भ्रमणध्वनीवर एक जणाने तुमची मुलगी इथे ऊसतोडणीसाठी आलेली आहे तिची प्रकृती बरी नाही, अशी माहिती दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस फौजदार कैलास पाटील आणि मनोहर पाटील हे मुलीच्या आई-वडिलांना घेऊन थाळनेर येथे गेले मात्र पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी अंगावर खाकी वर्दी न घालता चक्क डॉक्टरचे कपडे घातले आणि गळ्यात स्टेथोस्कोप लटकवला.

आरोपीला पोलिसांच्या या कृतीचा अजिबात अंदाज नव्हता त्यामुळे तात्काळ पोलिसांनी कारवाई करत आरोपी नंदू सोनवणे याला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली.


शेअर करा