
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली असून धुळे जिल्ह्यात झोपडीमध्ये एकटी असल्याची संधी साधत एका नराधमाने अवघ्या आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे. धुळे तालुक्यातील बोरीस येथे ही घटना गुरुवारी उघडकीला आली असून धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सदर प्रकरणी संशयित असलेला रवींद्र बेहेरे याला अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील मूळ असलेली एक महिला कुटुंबासह मोलमजुरी करून बोरीस येथे राहात आपला उदरनिर्वाह करते. गुरुवारी दुपारी बारा वाजता आठ वर्षीय बालिका झोपडीमध्ये एकटीच होती. झोपडी आणि झोपडीच्या परिसरात कोणीच नाही अशी नराधमाने पाळत ठेवून तो झोपडीत आला आणि आणि तिला एकटे पाहून तिच्यावर अत्याचार केला आणि तिथून पळून गेला.
पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने तिला झालेला प्रकार कथन केला त्यावेळी घरी कोण कोण आले होते असे विचारल्यानंतर मुलीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित रवींद्र धोटु बेहरे याचे नाव समोर आले आणि महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली त्यानुसार त्याला बेड्या ठोकण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.