‘ तब्बल ‘ इतक्या लाखांचे सोने घेऊन लग्नाच्या आधी नवरदेवच गेला पळून , महाराष्ट्रातील प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून दोन लाख 75 हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिका वाटल्यानंतर लग्नाचा मुहूर्त जवळ येताच नवरदेवाने पलायन केले आहे. बार्शी तालुक्यातील तांबेवाडी इथे हा प्रकार समोर आलेला असून नवरा असलेला आकाश जाधव आणि त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलीच्या वडिलांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैराग पोलिसात धाव घेतली.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी झाला होता त्यावेळी फिर्यादी चव्हाण यांनी नवरदेव बसलेला मुलगा आकाश याला एक तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि त्याचे वडील नामदेव दगडू जाधव यांना दोन तोळ्याची सोन्याची चैन असे एकूण अडीच लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोने दिले होते आणि रोख पंचवीस हजार रुपये असा एकूण दोन लाख 75 हजार रुपये त्यांनी खर्च केला होता.

लग्नाची तारीख 15 एप्रिल रोजी ठरवली होती आणि मुलीच्या वडिलांनी त्या पद्धतीने लग्नपत्रिका छापून आपल्या. नातेवाईकांना देखील कळवले होते मात्र लग्नाची तारीख जवळ आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांना फोन केला त्या वेळी मुलाच्या वडिलांनी माझा मुलगा आकाश हा उस्मानाबाद येथे रूमवर राहात होता तो कुठे गेला हे माहित नाही , असे मुलीच्या वडिलांना सांगितले.

मुलीच्या वडिलांनी आता माझ्या मुलीचे लग्न कसे करु. मी सर्व गावातील सर्व नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला कळवले आहे असे विचारले असता मुलाचे वडील यांनी ‘ तुमच्या मुलीचे लग्न कसे करायचे ते तुम्ही ठरवा हे लग्न होणार नाही ‘ असे सांगत हात वर केले. त्यानंतर सदर कुटुंबाने आपली फसवणूक केल्याची जाणीव मुलीच्या वडिलांना झाली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक परजणे पुढील तपास करत आहेत.


शेअर करा