.. तब्बल तीन वर्षांपासून पुण्यात त्या डॉक्टरची (?) भलतीच प्रॅक्टिस

शेअर करा

पुणे शहरात एक वेगळीच पण विचित्र घटना समोर आलेली असून एका तोतया डॉक्टरने चक्क तब्बल ३०० हुन जास्त लोकांच्या हेअर ट्रान्सप्लांट केल्याची बातमी आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव असून त्याच्या हाताखालील महिला ह्या फक्त १० वी शिकलेल्या असल्याची माहिती पुढे आली आहे .

कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे दाखवत त्याने हा काळधन्दा सुरु केला होता . गेल्या तीन वर्षांपासून त्याची ही ‘ प्रॅक्टिस ‘ सुरु होती मात्र अखेर महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अ‍ॅस्थेटिक स्टुडिओ येथे कारवाई करत या डॉक्टरला बेड्या ठोकल्या.

शाहरुख शाह हा एका हेअर ट्रान्सप्लांटसाठी प्रत्येकाकडून २५ ते ३० हजार रुपये घेत असे. तीन वर्षांपासून त्याचा हा धंदा सुरु होता आणि त्याचे शिक्षण हे केवळ बीएस्सी झाल्याचे समजते . त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या दोन महिलांना परिचारिकेचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांच्याकडून परिचारिका म्हणून काम करुन घेतले जात होते तर त्याची हेअर ट्रान्सप्लांटशी संबंधित स्वतःची देखील कोणतीच पदवी नसल्याचे समोर आले आहे . डोक्याला झंझट नको म्हणून बहुतांश व्यवहार तो कॅशच करत होता .


शेअर करा