तब्बल दोनशे फूट खोल विहिरीत कबुतर धरायला उतरला अन त्याच वेळी..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीला येत असताना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून कबूतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या करण उर्फ काळू चुडामण भिल्ल ( वय 24 राहणार शेळगाव तालुका जळगाव ) या तरुणाचा पाय घसरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी करण विहिरीत पडला आणि रविवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी दुपारी करण हा शेळगाव येथील रहिवासी असलेले गिरीश सदाशिव पाटील यांच्या विहिरीजवळ कबूतर पकडण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत त्याचा भाचा तापीराम भिल आणि पुतण्या सम्राट भिल हे दोघे होते. विहिरीत कबुतराचे घरटे असल्याने तिथे कबूतर पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो 200 फूट खोल विहिरीतील पाण्यात पडला त्यानंतर पुतण्या सम्राट याने घरी धाव घेत कुटुंबाला माहिती दिली.

पोलीस पाटील विलास पाटील आणि गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतून त्याला काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाळात अडकला त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. रविवारी दुपारी नशिराबाद पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नशिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकाराची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा