तरुणाच्या सापाला घेऊन दोरीउड्या, व्हिडीओ व्हायरल होताच संतापाची लाट

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आली असून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओबद्दल सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे . पालघरमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून एक युवक चक्क पकडलेल्या सापासोबत दोरी उद्या मारत असल्याचा हा व्हिडीओ असून मुक्या जनावराचा जीव धोक्यात घालणाऱ्या या व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे .

तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण हातात बिनविषारी असलेल्या धामण जातीचा साप पकडून त्या सापासोबत दोरी उड्या मारत आहे. फक्त पॉप्युलर होण्यासाठी मुक्या जनावराच्या जीवाशी खेळत त्याने हा व्हिडीओ बनवलेला असून या व्हिडीओवर सर्प मित्रांसह नागरिकांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.


शेअर करा