‘ ..तर आम्हाला पैसे द्यावे लागतील .. ‘, पुण्यात कंपनीच्या कार्यालयावर हल्ला

शेअर करा

पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळून येत आहे अशीच एक घटना पिंपरी येथे उघडकीला आली असून कोयता दांडके आणि दगड मारुन एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे एका टोळक्याकडून नुकसान केले गेले आणि त्याचा जाब विचारला असताना त्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड देखील हिसकावून घेण्यात आली. पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पिंपरीतील रिव्हर रोड येथील बौद्धनगर कमानीजवळ 13 तारखेला संध्याकाळी ही घटना घडलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील रिव्हर रोड येथे बौद्धनगर कमानीच्या जवळ फिर्यादीच्या पीएस फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या कार्यालयावर आरोपींनी लोखंडी कोयते, लाकडी दांडके आणि दगड मारुन तोडफोड केली त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली असता ‘ तू लोकांना व्याजाने पैसे देतो. चांगले पैसे कमावतो. जर तुला इथे सुखाने धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील ‘, असे मुख्य आरोपी चंदनशिवे त्यांना म्हणाला.

फिर्यादी यांनी कसले पैसे विचारले असताना आरोपींनी त्यांच्या खिशात हात घालत फिर्यादीच्या खिशातील अकराशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत पुन्हा शिवीगाळ केली आणि ‘ पोलिसात गेला तर बघून घेऊ ‘ अशी देखील धमकी दिली त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

प्रमोद दत्तात्रय साबळे (वय ३६ राहणार बौद्ध नगर पिंपरी ) यांनी 14 तारखेला पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बाळ्या उगले ( वय 22 ) काळ्या उर्फ प्रकाश मगर ( वय 25 ) शुभम घरवाडवे ( वय 25 तिघेही राहणार रिवर रोड पिंपरी ), मुन्या उर्फ महेश चंदनशिवे ( वय 27 ) संजय गजानन मुरकुडे ( वय 21 ) आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संजय मुरकुडे याला बेड्या ठोकल्या आहेत .


शेअर करा