
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासुन महिलांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते आहे अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघडकीला आलेली असून एका ॲपवर महिलेसोबत ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा फायदा घेत पीडित महिलेची तब्बल सात लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सात लाखांच्या बदल्यात 48 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून नेपाळ येथील संशयित आरोपींनी वेगवेगळ्या खात्यावर हे पैसे महिलेला जमा करायला लावले आणि त्यानंतर काढून घेतले.
उपलब्ध माहितीनुसार पीडित महिलेचे वय 42 वर्षे असून करमाळा पोलिसांनी विजय पाटील, रॉबर्ट फाईट, अंकिता अग्रवाल, अरुण सिंग अशी कथित नावे असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
आठ महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया ॲपवरून नेपाळ येथील विजय पाटील या संशयित आरोपीशी महिलेची ओळख झाली होती. भारतात आल्यानंतर तुला भेटेल असा विश्वास देत त्यांनी हळूहळू व्हाट्सअप आणि आणि फोनवर बोलत संपर्क वाढवला त्यानंतर गोवा येथील एका फायनान्स कंपनीमध्ये 2018 मध्ये 38 लाख गुंतवलेले आहेत आता त्याचे 40 लाख मिळणार आहेत मात्र त्यासाठी एका विश्वासू व्यक्तीची गरज आहे.
त्याच्या अकाउंटवर हे पैसे जमा करण्यात येतील म्हणून तुम्ही मला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स व्हाट्सअप वर पाठवा आणि त्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून त्यांनी या महिलेला गुंतवणूक करायला भाग पाडले आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर या महिलेने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.