
सोशल मीडियावर एक प्रकरण सध्या चांगलीच चर्चेत आलेले असून अक्षय ऊर्जा कंपनी चालवणाऱ्या एका व्यापाऱ्याला व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्याने तो कॉल उचलला त्यावेळी समोर एक महिला नग्न अवस्थेत दिसून आली. तिचे नाव रिया शर्मा असे असून आपण गुजरात येथील मोरबी इथे राहत आहोत असे तिने सांगितले. व्यापाऱ्याच्या मनात लालसा उत्पन्न होईल असे करत तिने देखील त्याला देखील अशाच पद्धतीने कपडे उतरवायला लावले आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ तिने दुसरीकडे रेकॉर्ड केला आणि त्यानंतर हा कॉल अचानक कट झाला.
सदर प्रकारानंतर व्यापारी घाबरून गेला होता त्यानंतर काही दिवसात त्याला एका महिलेने फोन केला आणि तुम्ही मला नग्न अवस्थेत पाहिलेले आहे . मला आता 50 हजार रुपये द्या नाहीतर तुमचा हा मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून देईल अशी देखील तिने धमकी दिली. सुरुवातीला घाबरून त्याने तिला सांगितलेल्या खात्यात 50000 रुपये देऊन टाकले. आठ ऑगस्ट रोजी त्याने हे पैसे तिच्या खात्यात जमा केले.
व्यापाऱ्याचा सर्व काही व्यवसाय सुरळीत रित्या चालू असता पुन्हा एकदा आपण दिल्ली पोलीस येथून गुड्डू शर्मा बोलत आहोत असे सांगत या पोलिसाने तुमची अश्लील क्लिप माझ्याकडे आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही मला तीन लाख रुपये देऊन टाका असे सांगत खंडणी मागितली. पोलिसात प्रकरण गेल्यानंतर व्यापारी घाबरून गेला आणि त्याने तात्काळ सांगितलेल्या खात्यात तीन लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा सर्व बनावटगिरीचा प्रकार आहे हे या व्यापाऱ्याला लक्षात आले नाही.
काही दिवस असेच गेल्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमधून आम्ही बोलत आहोत असा दावा करत या व्यापाऱ्याला आपण सायबर सेलचे अधिकारी आहोत असे सांगत एका व्यक्तीने संबंधित महिलेने तुम्ही ज्या महिलेसमोर कपडे उतरवले होते तिने आत्महत्या केलेली आहे त्यामुळे तुमच्या तुमच्यावर आता गुन्हा दाखल होईल असे सांगत तब्बल 81 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे ही देखील रक्कम या व्यापाऱ्याने सांगितलेल्या खात्यात जमा केली मात्र त्यानंतरही असाच प्रकार होत असल्याने अखेर 10 जानेवारी रोजी या व्यापाऱ्याने सायबर क्राईम ब्रँच पोलीस गाठत 11 जणांच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.