‘ तूच मला पैसे देत नाहीस ‘ , हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

शेअर करा

कुठलाही व्यवसाय चालवणे हे तितकेसे सोपे नसते मात्र त्यात हॉटेल व्यावसायिकांचा संबंध हा बहुतांश ग्रुपने येणाऱ्या लोकांशी आणि काही वेळा नशेत असलेल्या लोकांशी येत असल्याने त्यांना हँडल करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. ग्रुपने आल्यामुळे अनेकदा हॉटेल व्यावसायिकाला दमदाटीची आणि मारहाण केल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत. अशीच एक घटना कोल्हापूर येथे उघडकीला आले असून खंडणीसाठी चक्क व्यावसायिकाच्या वडिलांच्या अंगावर गुप्ती उगारत पैसे दिले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे.

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे महालक्ष्मी चेंबर येथील हॉटेल पंचगंगामध्ये हा प्रकार घडलेला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात संकेत हर्षद बिरांजे ( राहणार मातंग वसाहत राजारामपुरी ) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन यशवंत खोपडे ( राहणार साईनाथ कॉलनी टेंबलाईवाडी ) यांचे महालक्ष्मी चेंबर्स मध्ये पंचगंगा नावाने हॉटेल आहे तर संशयितअसलेला संकेत हर्षद बिरांजे हा महालक्ष्मी चेंबर समोर ड्रायव्हर बसमध्ये पॅसेंजर भरण्याचे काम करतो. संकेत हा गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने हॉटेलमध्ये येत दारू पिण्यासाठी आणि सिगरेटसाठी पैशाची मागणी करत होता. त्याला नकार दिला असता त्याने नितीन खोपडे आणि त्याच्या वडिलांना ग्राहकांसमोर चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

गुरुवारी दुपारी संशयित बिरांजे हा हॉटेलमध्ये आला आणि त्याने खोपडे यांचे वडील यशवंत दौलत खोपडे यांच्या अंगावर गुप्ती उभारत ‘ मागील सर्व दुकानदार मला पैसे देतात तूच देत नाहीत,’ असे म्हणत पैसे दिले नाही तर तुला संपवतो असे म्हणाला आणि तुला आता जिवंत ठेवणार नाही अशी त्याने धमकी दिली आणि दोनशे रुपये घेऊन तो पसार झाला त्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसात तक्रार दिली.


शेअर करा